Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! आता या महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये; कसं? जाणून घ्या पुर्ण माहिती

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती.मात्र, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता आला नाही त्या महिला आता अर्ज करु शकतात. या योजनेत सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आधीच्या दोन महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचाही हप्ता मिळणार आहे.म्हणजेच महिलांना एकूण ४५०० रुपये मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मदत केली जाते. या योजनेत २.५ कोटी महिलांचा समावेश केला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली होती. राज्य सरकारने आतापर्यंत १.७ कोटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेत निधी जमा केला आहे.

हे वाचा : Ladki Bahin Yojana Update:लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता याच महिलांचे अर्ज होणार मंजूर .!

Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना

या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिला, अवावहित महिला, विधवा या महिला अर्ज करु शकतात. अर्जदार महिलांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा