महाराष्ट्र शासनाच्या काही शेती विषयक योजना खाली दिलेल्या आहे त्या योजनांची माहिती आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
कृषी योजना
शेतकरी वर्गासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध आहेत. माती, बियाणे, सिंचन, यंत्रे, तंत्रज्ञान, पत, विमा, पिकाला संरक्षण आणि विपणन हे शेतीशी संबंधित महत्वपूर्ण घटक आहेत. तुम्हाला याबाबत सहाय्य हवे असल्यास राज्य सरकारने देऊ केलेल्या विविध योजनांबाबत जाणून घ्या.
01. राष्ट्रीय कृषी बाजार – eNAM
नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट किंवा ई-नाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री मंच आहे. हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त ठरतो आहे.
शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडया या मंचाचे भाग आहेत. नोंदणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे वाचून घ्या आणि या मंचावर नाव नोंदणी करा. या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनांची यादीही तुम्हाला पाहता येईल.
अधिक तपशीलांसाठी eNAM संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही eNAM अॅपसुद्धा डाउनलोड करू शकता.
02.प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
पीएम-किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात न घेता, स्वत:च्या नावावर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रूपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता आणि लाभाची स्थिती तपासू शकता. जास्त तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही संकेतस्थळाला भेट द्या किंवा पीएम किसान अॅप डाउनलोड करा.
मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधता येईल आणि या योजनेच्या तपशीलांबद्दलही अधिक जाणून घेता येईल.
💡हे पण वाचा BPL Ration Card : रेशनकार्डमधील बीपीएलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, पुर्ण माहिती येथे पाहा..
03. कृषी तारण कर्ज योजना
या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता आणि त्या उत्पादनाच्या किंमतीच्या ७५% रक्कम कर्ज म्हणून मिळवू शकता. बाजारात उत्पादनांचे दर वधारले की तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तुमच्या उत्पादनाला जास्त चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही योजना एक वरदानच आहे.
💡हे पण वाचा ; रासायनिक खतांचा संतुलित वापर कसा करावा ?
04.सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना
या योजनेत, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट/कंपनी, संस्था, निर्यातदार किंवा शेतकरी या पैकी जे कोणी निर्दिष्ट कृषी उत्पादनाची निर्यात करेल, ते रू. ५०,०००/- प्रति कंटेनर ( २० फूट/४० फूट) इतक्या अनुदानास पात्र असतील. प्रति लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये इतके असेल.
05 फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना
या योजनेंतर्गत आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्षे अशी हंगामी फळे तसेच उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत धान्य विक्रीसाठी उत्सव आयोजित केले जातात. महोत्सवाचा कालावधी किमान पाच दिवसांचा असावा अशी पूर्व अट असून महोत्सवासाठी प्रति स्टॉल रु.2000/- इतके आर्थिक सहाय्य देय असेल.
06 रस्त्याद्वारे मालवाहतूक अनुदान योजना
महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये रस्ते वाहतुकीद्वारे शेतमालाच्या थेट विक्रीच्या व्यवहारासाठी ही योजना उपयुक्त आहे. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी, उत्पादक कंपन्या आणि कृषी उत्पादक सहकारी संस्था या योजनेंतर्गत अनुदानास पात्र आहेत.
Agricultural Schemes
Being a farmer, you can avail benefit of many wonderful schemes offered by the government. Soil, seed, irrigation, machinery, technology, credit, insurance, plant protection and marketing are essential components of farming. If you require any assistance in this regard, please check for the various schemes offered by the state government to cater to your needs.
National Agriculture Market – eNAM
National Agriculture Market or eNAM is an online trading platform for agricultural commodities in India. The market facilitate farmers, traders and buyers with online trading in commodities. The market is helping in better price discovery and provide facilities for smooth marketing of their produce.
Apart from farmers, Agricultural Produce Market Committee, traders, Farmer Producer Organizations and Mandi Boards are parts of this platforms. You can read Registration guidelines and register yourself. Check the list of commodities traded on this platform.
Please visit eNAM website for more details. You can also download eNAM app.
Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi scheme
This scheme is popularly known as PM-Kisan scheme and provides income support of Rs.6,000 per year to all farmer families having cultivable land in their name, irrespective of the size of their landholdings. The fund is directly transferred to the bank accounts of the beneficiaries.
You can register for the scheme to avail the benefits of this scheme and check the status as well. You can check the details on website or simply download PM Kisan App to check more details.
You may contact Help desk for assistance and know more about details of this scheme.
Agricultural Pledge Loan scheme
This is a useful scheme in which as a farmer, you can keep your produce in the Agricultural Produce Market Committee – APMC godown and get 75% of the value as loan. As the prices of the commodity rise in the market, you can sell your produce in the market and repay your loan, thus fetch higher price for your produce.
Subsidy scheme for export of agriculture commodities by sea route
In this scheme, the Cooperative Society, Farmer Producer Group/ Company, Firm, Exporter or Farmer, whoever will export designated agriculture commodity, will be eligible for a subsidy worth Rs. 50,000/- per container (20 feet/40 feet). The maximum subsidy per beneficiary will be Rs. 1 Lakh per year.
Fruit and Grain festival subsidy scheme
This scheme is implemented to organize festivals for sale of seasonal fruits like mangoes, oranges, sweet oranges, grapes, etc. as well as grains directly from producers to consumers. The duration of the festival should be at least 5 days and financial assistance of Rs.2000 / – per stall for the festival will be payable.
Road transport subsidy scheme
This scheme is applicable only for the transaction of direct sale of agricultural commodities by road transport from Maharashtra to other states. Registered farmer producer companies and agricultural producers co-operative societies in the State are eligible for subsidy under the scheme.