Ration Card Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांनी तातडीने ई-केवायसी पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना रेशन मिळणे बंद होऊ शकते. केंद्र सरकारने शिधापत्रिकेवरील धान्य वितरणाच्या लाभार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यासाठी ई-केवायसी पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी या प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर ही पडताळणी पूर्ण करावी.
Ration Card Update : काय आहे ई-केवायसी प्रक्रिया?
ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक केवायसी, जी आपली ओळख डिजिटल माध्यमातून पडताळण्यासाठी करण्यात येते. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार क्रमांकाची पडताळणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पूर्ण केली जाते आणि त्यानंतर लाभार्थ्यांना रेशन मिळण्याचा लाभ कायम राहील.
Ration Card Update: का आवश्यक आहे ई-केवायसी?
ई-केवायसी प्रक्रिया पारदर्शकतेसाठी महत्वाची आहे. अनेक कुटुंबांमध्ये मयत लाभार्थ्यांच्या नावावर अद्याप रेशन दिले जात आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे नावे वगळून खरी गरजवंत लाभार्थ्यांना धान्य मिळावे हा उद्देश आहे. तसेच, स्थलांतरित कुटुंबांनी आपले नवीन पत्त्याच्या आधारावर ई-केवायसी करून घ्यावी.
Ration Card Update : साठी 15 जूनची अंतिम तारीख
सर्व रेशन कार्ड धारकांनी 15 जून 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांना रेशन मिळणे बंद होऊ शकते. स्वस्त धान्य दुकानदारांना या कामाची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Ration Card Update: साठी ई-केवायसी कसे करावे?
- स्वस्त धान्य दुकानात जाऊन: आपल्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊन तिथे उपलब्ध ई-पॉस डिजिटल यंत्रणेद्वारे आधार क्रमांकाची पडताळणी करावी.
- निशुल्क प्रक्रिया: ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. भविष्यात खाजगी केंद्रात केल्यास शुल्क आकारले जाऊ शकते.
- 4G तंत्रज्ञान: नवीन 4G ई-पॉस मशीनद्वारे ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोयीस्कर बनली आहे.
रेशन कार्ड धारकांसाठी ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. 15 जूनच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून रेशनचा लाभ सुरू ठेवावा. या प्रक्रियेने आपल्या कुटुंबाच्या धान्य वितरणात पारदर्शकता येईल आणि योग्य लाभार्थ्यांना हक्काचे रेशन मिळेल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी तातडीने आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि शासनाच्या या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
Ration Card Update: रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी: 15 जून पर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन बंद! पुर्ण माहिती पाहा