![MSP Kharif Crop](https://shetkarinama.in/wp-content/uploads/2024/06/20240627_223417-1024x576.jpg)
नवी दिल्ली : २०२४-एमएसपीमध्ये किती वाढ ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (MSP Kharif Crop) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसी मान्य करून १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्या.
MSP Kharif Crop : एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ
केंद्र सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. बुधवारी (19 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हमीभाव वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर याच बैठकीत हमीभावासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची माहिती दिली.
Kharif Crop Loan : खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला मिळत आहे ? पुर्ण माहिती पाहा
MSP Kharif Crop :एमएसपीमध्ये किती वाढ ?
धान्य | २०२४-२५ | २०२३-२४ | वाढ |
तांदूळ (सामान्य) | २,३०० | २,१८३ | ११७ |
तांदूळ (ए ग्रेड) | २,३२० | २,२०३ | ११७ |
ज्वारी (हायब्रीड) | ३,३७१ | ३,१८० | १९१ |
ज्वारी (मालदंडी) | ३,४२१ | ३,२२५ | १९६ |
बाजरी | २,६२५ | २,५०० | १२५ |
रागी | ४,२९० | ३,८४६ | ४४४ |
मका | २,२२५ | २,०९० | १३५ |
तूर | ७,५५० | ७,००० | ५५० |
मूग | ८,६८२ | ८,५५८ | १२४ |
उडीद | ७,४०० | ६,९५० | ४५० |
भुईमुग | ६,७८३ | ६,३७७ | ४०६ |
सूर्यफूल | ७,२८० | ६,७६० | ५२० |
सोयाबीन | ४,८९२ | ४,६०० | २९२ |
सोयाबीन | ९,२६७ | ८,६३५ | ६३२ |
रामतीळ | ८,७१७ | ७,७३४ | ९८३ |
कापूस (मध्यम धागा) | ७,१२१ | ६,६२० | ५०१ |
कापूस (लांब धागा) | ७,५२१ | ७,०२० | ५०१ |
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
MSP Kharif Crop : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमिभावात झाली वाढ,