Maharashtra Rain Update : सध्या राज्यात कुठं जोरदार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडत आहे. काही ठिकाणी मोठा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पावसाबाबत पंजाबराव डखांनी (Panjabrao dakh) महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.
येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी दिलेला आहे.पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. यानंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमिभावात झाली वाढ , पिकांची यादी पाहा

26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडणार ( Maharashtra Rain Update )
26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस (Maharashtra Rain Update) पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ज्या जिल्ह्यात चांगला पाऊस, त्या ठिकाणी पेरणीला सुरुवात ( Maharashtra Rain Update )
चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या (Maharashtra Rain Update) प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 100 मिलीमीटर पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Maharashtra Rain Update , राज्यात कोणत्या दिवशी पाऊस पडणार ,