Mudra Loan yojana : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केलेला असून यामध्ये विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आता मुद्रा कर्जाची मर्यादा ही दुप्पट केलेली आहे. त्यामुळे आता या योजनेच्या माध्यमातून २० लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज घेता येणार आहे. परंतु या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? याकरता कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये समजून घेऊया.
युवकांना स्वावलंबी बनवण्याकरता प्रधानमंत्री मुद्रा योजना चालवली जात आहे. या अगोदर योजनेच्या माध्यमातून युवकांना १० लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज दिले जात होते. परंतु आता या योजनेच्या माध्यमातून वीस लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज प्राप्त करून देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये बिगर कॉर्पेट आणि बिगर कृषी कारणांकरता कर्ज दिले जाते. त्यामुळे आता जे युवक बेरोजगार आहेत त्यांना स्वतःचा जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ज्यांना व्यवसाय वाढवायचा असेल परंतु त्यांच्याकडे निधी प्राप्त नसेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ देणार आहे.
३ श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध होईल (Mudra Loan yojana)
सद्यस्थितीमध्ये या योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ३ श्रेणीमध्ये उपलब्ध करून दिले जाते. आता यामध्ये वाढ करून २० लाख रुपयांपर्यंत कर्ज वितरित केले जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये या कर्जाचे वितरण कशाप्रकारे केले जाते जाणून घेऊया.
- शिशु कर्ज :- यामध्ये ५० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळवून दिली जाते
- किशोर कर्ज :- या योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
- तरुण कर्ज :- या योजनेमध्ये १० लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्ज म्हणून वितरित केली जाते.
कर्ज घेण्याकरता पात्र लाभार्थ्यांना खालील अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे
मुद्रा योजना अंतर्गत कर्ज घेण्याकरता अर्जदाराला प्रथम व्यवसाय योजना तयार करावी लागणार आहे.सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेला द्यावी लागतील बँक तुम्हाला बिजनेस प्लॅन प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे विचारेल ती बँकेला तुम्हाला सादर करावे लागतील.
या योजनेचा लाभ घेण्याकरता अटी काय आहे? (Mudra Loan yojana)
- या योजनेचा लाभ घेण्याकरिता व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा कोणताही बँक डिफॉल्ट इतिहास नसावा (बँक क्रेडिट स्कोर चांगला असावा)
- कोणताही व्यवसाय ज्या करता मुद्रा कर्ज घ्यायचे आहे ती कॉर्पोरेट संस्थां नसावी.
- कर्ज करता अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षानपेक्षा जास्त असायला हवे.
हे पण वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा नवीन 6 मोठे बदल; अर्ज करणे झाले सोपे! लगेच पहा
या योजनेचे फायदे काय आहे? (Mudra Loan yojana)
- हे कर्ज पात्र नागरिकांना तारण मुक्त असणार आहे त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क नसेल
- या योजनेअंतर्गत कर्जाचा एकूण परतफेड कालावधी हा 12 महिने ते ५ वर्षे पर्यंतचा असणार आहे. परंतु तुम्ही जर ५ वर्षांमध्ये परतफेड करू शकला नाही तर तुमचा कार्यकाळ आणखी ५ वर्षांनी वाढवला जाऊ शकतो.
- या कर्जाची विशेष चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंजूर केलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवरती व्याज द्यावे लागत नाही.
- तुम्ही मुद्रा कार्ड च्या माध्यमातून काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाणार आहे.
- तुम्ही जर भागीदारी मध्ये कुठलाही व्यवसाय करत असाल तर तुम्ही मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता.
- तुझ्या योजनेमध्ये नागरिकांना तीन श्रेणीमध्ये कर्ज वितरित केले जाते. प्रत्येक श्रेणी अनुसार व्याजदर हा बदलत असतो.
योजने करता अर्ज कसा कराल? (Mudra Loan yojana)
- याकरता सर्वप्रथम तुम्हाला मुद्रा योजनेच्या https://www.mudra.org.in/ अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
- समोर मुख्यपृष्ठ उघडेल त्यावर तीन प्रकारचे कर्ज ऑप्शन तुम्हाला दिसतील.
- शिशू कर्ज
- किशोर कर्ज
- तरुण कर्ज
- तुमच्या आवडीनुसार व योग्यतेनुसार तुम्हाला श्रेणी निवडून घ्यायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल तुम्हाला तिथून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल आणि अर्जाची प्रिंट काढावी लागेल.
- तुम्हाला अर्ज हा व्यवस्थित व योग्यरीत्या भरून घ्यायचा आहे. त्या अर्जामध्ये तुम्हाला काही कागदपत्रांच्या छायाप्रती विचारल्या जातील जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि वैयक्तिक पत्त्याचा पुरावा, आयकर रिटर्न आणि सेल टॅक्स रिटर्न ची प्रत व पासपोर्ट आकाराचा फोटो ई.
- यानंतर हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेमध्ये तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे.
- बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि कर्ज एक महिन्याच्या आत मध्ये तुम्हाला दिले जाईल.
⬇️हे पण वाचा :