ladki Bahin Yojana list :लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर; अशाप्रकारे चेक करा

ladki Bahin Yojana list
ladki Bahin Yojana list
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

ladki Bahin Yojana list : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याकरता आतापर्यंत एक कोटी 25 लाख 44 हजार ०८३ महिलांनी अर्ज सादर केलेले आहे. या सर्व अर्जदार महिलांना आता पात्रता यादी जाहीर करण्यात येत आहे. ही यादी तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता याविषयीची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.

ladki Bahin Yojana list

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. ज्या गावाच्या किंवा जिल्ह्याच्या याद्या संकेतस्थळावरती दिसत नाही आहेत त्या लवकरच अपडेट करण्यात यतील.

यादी चेक करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या जिल्ह्या नगरपालिकेचे नाव/महानगरपालिकेचे नाव गुगल वरती सर्च करायचे आहे. यानंतर अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तिथे तुमच्या जिल्ह्याची यादी बघायला मिळेल. सद्यस्थितीमध्ये धुळे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गुगलमध्ये dude municipal corporation अशाप्रकारे लिहायचे आहे यानंतर तुमच्या जिल्ह्याचे अधिकृत वेबसाईट ओपन होऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे. यासमोर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण यादी डाऊनलोड करू शकता.

ladki Bahin Yojana list

यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला ऑनलाईन यादी बघता आली नाही तर कुठे पहाल यादी? (ladki Bahin Yojana list)

पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या गावात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी बघता येणार आहे. कारण आता प्रत्येक गावामध्ये समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन केले जाणार आहे.

त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजने करता पात्र ठरला आहे किंवा नाही याची खात्रीशीर माहिती मिळणार आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्व महिलांनी गावातील समितीची यादी वाचना दरम्यान हजर राहणे आवश्यक असणार आहे.

ग्रामस्तरीय समितीच्या अंतर्गत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादींचे वाचन करावेच लागणार आहे तसेच त्यामध्ये काही बदल असेल तर तेही सुद्धा अपडेट करण्यात येणार आहे.

➡️हे पण वाचा : रेशन कार्ड होणार बंद लवकर करा हे काम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

सहकार्य करा : ही महत्त्वाची माहिती खालील सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

⬇️ हे पण वाचा :

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा