Ladli Lakshmi Yojana: या राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी सरकार करतेय १ लाख रुपयांची मदत; काय आहे लाडली लक्ष्मी योजना ? पाहा सविस्तर

Ladli Lakshmi Yojana ,
Ladli Lakshmi Yojana

Ladli Lakshmi Yojana माहिती

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Ladli Lakshmi Yojana : सरकार नेहमीच महिला आणि मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना. मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

मध्य प्रदेश सरकारची ही मुलींसाठी खास योजना आणलेली आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. लाडली लक्ष्मी योजनेत महिलांना १७०००० रुपयांची मदत केली जाते.

लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यात सरकारकडून १,४३,००० रुपये दिले जातात. या योजनेत मुलींना इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी २००० रुपये दिले जातात. इयत्त ९वीत प्रवेश घेण्यासाठी ४००० रुपये दिले जातात. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात.तर बारावीत प्रवेश घेण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात.

Ladli Lakshmi Yojana

या योजनेत मुलींना दहावीनंतर किंवा १२ वी नंतर इतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना २५,००० रुपयांची मदत केली जाते. हे पैसे दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.याचसोबत जर मुलींना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना आर्थिक मदत केली जाते.

 हे सुद्धा वाचा : आनंदाची बातमी.! 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी 88 हजार शेतकऱ्यांना! 31 ऑगस्टपूर्वी पैसे जमा!

मुलींचे २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे १ लाख रुपयांची मदत केली जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलींच्या नावाने खाते उघडू शकतात.यासाठी तुम्हाला https://ladlilaxmi.mp.gov.in/llyhome.aspx या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. लाडली लक्ष्मी योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, बँकेचे कागदपत्रे आणि फोटो आवश्यक आहेत.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा