हौसेला मोल नाही, असं म्हटलं जातं. मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथील एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपये मोजले आहेत. एव्हढी लाखमोलाची काय खरेदी केलीये या शेतक-यानं पाहूया या लेखमधून.
काहीही करायचं पण शेतकऱ्याचा नाद नाही करायचा, अशा डायलॉगवर शिट्यांचा, टाळ्यांचा जोरदार पाऊस पडतो. असाच एक नाद पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. तिन्हेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहेत. एका शर्यतीत वा-याच्या वेगानं धावणा-या किटली नावाच्या बैलाला त्यांनी पाहिलं आणि त्यांना तो पसंद पडला. मग काय काही करुन किटलीला खरेदी करायचं असा चंगच त्यांनी बांधला.
त्यासाठी त्यांना एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल 21 लाख रुपये मोजावे लागले. वाजतगाजत मोठ्या जल्लोषात त्यांनी किटलीला गावात आणलं. आलिशान कार घ्यायची म्हटली तरी 20 लाखांपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागते. या पठ्याने तर 21 लाख रुपये देऊन ‘किटली’ खरेदी केला. विशेष म्हणजे या बैलाला लहानपणी लम्पी आजार झाला होता. मृत्यूच्या दारातून परत आलेला किटली आता बैलगाडा शर्यत गाजवतोय. हे मात्र कौतुकाचे