Check Your First Installment : राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला सुरुवात झालेली आहे. या योजनेला सुरुवात होऊन एक महिना होत आहे याकरता राज्यभरातून अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेले असताना आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडक्या बहिणी योजनेचे जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते एकत्रित जमा होणार असून महिलांना तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बऱ्याच बहिणींचा आता गोंधळ उडाल्याची दिसून येत आहे. लाडक्या बहिणींना हाच एक प्रश्न पडला आहे की त्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले (Check Your First Installment) असणार तर याबाबतची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हे पैसे डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजे तुमचा आधार क्रमांक वापरून सुद्धा आता तुमच्या बँक खात्यावर येणारी रक्कम तुम्ही चेक करू शकणार आहात. याकरता तुमच्या बँकेचे डिटेल्स तपासले जाणार नसून ही रक्कम थेट तुमच्या डीबीटी मार्फत तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा (Check Your First Installment) केली जाणार आहे. मात्र महिलांचे असे प्रश्न आहेत की आमच्या कोणत्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले आहे हे आम्ही कशाप्रकारे चेक करावे तर खालील स्टेप फॉलो करून तुम्ही याविषयीची माहिती जाणून घेऊ शकता.
तुमच्या कोणत्या बँकेला आधार कार्ड जोडले अशाप्रकारे तपासा (Check Your First Installment)
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच महिलांचे एकापेक्षा अधिक बँक खाते असल्यामुळे नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये आपली रक्कम जमा होणार आहे याबाबतचा संभ्रम महिलांच्या मनामध्ये निर्माण होणे शक्य आहे. परंतु ही रक्कम डीबीटी च्या माध्यमातून कुठल्याही एकाच बँक खात्यावरती जमा होणार असून तुमच्या कोणत्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झालेली आहे खालील स्टेप फॉलो करून तुम्ही चेक करून घ्या.
- सर्वात अगोदर तुम्हाला आधारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचे आहे याची लिंक खाली दिलेली आहे
आधार कार्ड ला कोणते बँक जोडलेले आहे तपासण्यासाठी येथे क्लिक करा
- ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे
- वेबसाईट ओपन झाल्यावर सर्वप्रथम तुम्हाला Log in या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे
- यानंतर तुमचा 12 डिजिटचा आधार क्रमांक रिक्त जागेमध्ये टाकून घ्यायचा आहे
- यानंतर दिलेला कॅपच्या कोड टाकून Login With OTP या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे
- आता तुमच्या बँकेला लिंक असलेल्या मोबाईल वरती तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करून घ्यायचा आहे
- आता तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे 4 अंक तुमच्यासमोर दिसतील आणि बँकेचे नाव सुद्धा दिसेल आणि तुम्हाला तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे सुद्धा कळेल
- आधार कार्ड ला जी बँक लिंक आहे त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे जमा होणार आहे
- लाभार्थी महिला हे पैसे आपला थम लावून बाहेरून मनी ट्रान्सफर सेंटर वरून सुद्धा काढू शकता.
Check Your First Installment
अशाप्रकारे वरील स्टेप फॉलो करून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे किंवा नाही याची तुम्ही खात्री करू शकता.
हे वाचा : सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! 18 व्या हप्त्याचे 4,000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा