रासायनिक खताचे शेतीवर होणारे परिणाम

आजचे युग ही आधुनिक युग आहे या सध्याच्या काळात प्रत्तेकाला सगळ काही लगेच हव आहे तसेच शेती मध्ये सुद्धा हेच होत आहे एकेकाळी नैसर्गिक खतांचा वापर जास्त होत होता मात्र आता हा उपयोग कमी होत जात आहे कारण रासायनिक खतांचा वापर दिवसंदिवस वाढत चालला आहे या शेतीचे उत्पन्न तर वाढले मात्र जमिनीचा दर्जा कमी होत आहे. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत.महाराष्‍ट्रात गेल्‍या दोन दशकांमध्‍ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून २००१-०२मध्‍ये राज्‍यात एकूण १७ लाख मेट्रिक टन खत शेतीसाठी वापरले गेले होते, तो वापर आता ७० लाख मे. टनांपर्यंत पोहचला आहे.

रासायनिक खतांचा वापर का ?

  • शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी
  • कमी वेळात पीक वाढवण्यासाठी
  • योग्य वेळी योग्य प्रमाणात खतांचा वापर करून झाडे वाढतात.
  • संतुलित खत व्यवस्थापनामुळे पीक उत्पादन वाढवण्याच्या सर्व घटकांवर परिणाम होतो.
  • उच्च दर्जाचे पीक घेतले जाते.
  • पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते.
  • संतुलित खत व्यवस्थापनामुळे झाडांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता विकसित होते.
  • वनस्पतींच्या मुळांच्या विकासास मदत करते. फुले व फळांची संख्या वाढते.

रासायनिक खताचे शेतीवर होणारे परिणाम

  • आपण उत्‍पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. रासायनिक खताचां अधिक व सातत्‍याने वापर केल्‍यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्‍पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्‍यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर दयावे लागते. सा‍हजिच त्‍यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी जमीनी खारवटतात.
  • रासायनिक खतांप्रमाणे किटकनाशकांच्‍या वापराचेदेखील अनिष्‍ट परिणाम होत असल्‍याचे दिसून आले आहे. किटकांचा नाश करणारी किटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्‍यामुळे ज्‍याप्रमाणे उपद्रवकारक किटक मरतात त्‍याचप्रमाणे काही उपयुक्‍त जीवजंतूही बळी पडतात. खरे तर निसर्गाने स्‍वतःच अनेक गोष्‍टीचा समतोल साधण्‍याची व्‍यवस्‍था केलेली असते. निसर्गान ज्‍याप्रमाणे पिलांना उपद्रवकारक किटक असतात त्‍याचप्रमाणे या किटकांवर उपजीवीका करणारेही काही किटक पक्षी प्राणी असतात.
  • रासायनिक खतांच्‍या वापरातून जमिनीच्‍या पोतावर होणारा दुष्‍परिणाम टाळणे या खतांच्‍या पिकांच्‍या दर्जावर व पर्यायाने आपल्‍या आरोग्‍यावर होणारे दुष्‍परिणाम टाळणे किटकनाशके व तणनाशके यांचाही पिकांवर व पर्यायाने आरोग्‍यावर होणारा दुष्‍परिणाम टाळणे या उददेशातून सेंद्रीय शेती ही संकल्‍पना पूढे आली व विकसित झाली.

भारतात रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल?

  • जैव-सेंद्रिय खतांच्या संयोगाने रासायनिक खतांचे प्रमाण कमी केल्याने जमिनीची सुपीकता राखून रासायनिक खतांचा वापर मर्यादित होऊ शकतो. तथापि, मातीचे रासायनिक गुणधर्म, सूक्ष्मजीव समुदाय रचना आणि पीक उत्पादन आणि गुणवत्तेवर एकत्रित फलित होण्याचे परिणाम अज्ञात आहेत.
  • सिंथेटिक खतांचा वापर कमी करण्यासाठी तीन मूलभूत पद्धतींचा विचार केला पाहिजे: बारमाही कुरण आणि पिके, वार्षिक पिकांसाठी आवर्तनातील पिके आणि पशुधन उत्पादकांसाठी चांगले चर व्यवस्थापन . या पद्धतींमुळे मातीचा कार्बन तयार होतो, जो मातीचे आरोग्य आणि वनस्पतींची सुपीकता वाढवण्याची गुरुकिल्ली आहे.
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now