free gas cylinder : राज्य सरकार द्वारे नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या सवलती सोबतच जोडून आपले दामटविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बाजारभावामध्ये जर आपण खरेदी केले तर 830 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडर करता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून ३०० रुपयांची सवलत दिली जाते. मात्र यापुढे राज्य सरकार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे उर्वरित 530 रुपये अनुदान हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे.
राज्य सरकार द्वारे आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्वला योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना ही योजना लागू करण्यात येणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे.
➡️हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात! लवकर करा हे काम
या महिलांना मिळणार सुविधा (free gas cylinder)
माझी लाडकी बहीण योजने करता पात्र असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक साह्यासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर करता 530 रुपये अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा करून देण्यात येणार आहे.
लवकर करा हे काम (free gas cylinder)
या योजनेचा लाभ मिळवण्याकरता गॅसची जोडणी महिलाच्या नावाने असणे आवश्यक असणार आहे एका कुटुंबामध्ये (रेशन कार्ड अनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेकरता पात्र ठरणार आहे. याकरता सुरुवातीला तुम्हाला सिलेंडर पूर्ण रक्कम देऊन खरेदी करावे लागणार आहे. यानंतर अनुदानाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
⬇️हे वाचा :
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा