Government Scheme : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्या २ जुलै पर्यंत करा अर्ज , पुर्ण माहिती पाहा

Government Scheme : प्रधानमंत्री मातृ वंदना
Government Scheme : प्रधानमंत्री मातृ वंदना
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Government Scheme : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्या २ जुलै पर्यंत करा अर्ज पुर्ण माहिती पाहा माता तसेच बालकांचे आरोग्य सुधारण्याकरता या दृष्टिकोनातून गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधरावे माता मृत्यू व बालमृत्यू दरामध्ये घट होऊन तो नियंत्रित राहावा याकरिता केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Government Scheme : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबत माहिती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय महिला व बालकल्याण विभाग नवी दिल्ली द्वारे 18 जून ते दोन जुलै या कालावधीमध्ये ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये पहिले आपत्ती व दुसऱ्या पत्ती मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यांकरिता 18 ते 2 जुलै पर्यंत विशेष ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोहीम सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.2 राज्यात 9 ऑक्टोंबर 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरता जिल्ह्यातील आशा वर्कर व आरोग्य सेविकांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रामध्ये ऑनलाईन नवीन लाभार्थी नोंदणी व पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) खाते उघडण्याबाबत अभियान राबविण्यात येणार आहे जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते, माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल झुलके, तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक अश्विनी मेढे, साहेब कार्यक्रम समन्वयक चंदू वाघाडे यांनी केले आहे.

Government Scheme : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कोणाला दिला जातो ?

या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत आपत्यासाठी ५ हजार रुपयांचा दोन टप्प्यात तसेच दुसऱ्या अपत्य मुलगी जन्मल्यास सहा हजार रुपयांचा लाभ एका टप्प्यात थेट आधार लिंक व डीबीटी (एनपीसीआय) लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. ही योजना शासकीय सेवेत खाजगी सेवेत किंवा ज्या मातेला सहा महिन्यांची प्रसूती रजा मंजूर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.

Government Scheme : ग्रामीण भागामध्ये जनजागृती व्हावी

  • मातृ वंदना योजनेअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने महिलांना लाभ देण्यात येत असला तरी ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव आहे.
  • आशा वर्कर परिचारिका यांच्यामार्फत महिलांना सांगितले जाते परंतु बहुतांश महिला अर्ज सादर करत नाही.

हमीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज; कसं अप्लाय करायचं ? पुर्ण माहिती पाहा

Government Scheme : मातृ वंदना योजना लाभाकरता निकष

  • योजनेचा लाभ घेण्याकरता महिलांची वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांच्या आत असावे.
  • याकरता तहसीलदारांची उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांना जात प्रमाणपत्र जोडावे लागेल.
  • दिव्यांग महिलांसाठी किमान 40 टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी त्यांच्या नावाची रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला, किसान सन्माननीय अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला

निष्कर्ष : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा अशी आव्हान सरकार कडून करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.


अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Government Scheme