Hawaman Anadaz : महाराष्ट्र
Hawaman Anadaz : गेल्या मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. सध्या जुलै महिना सुरू असून जेव्हापासून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे तेव्हापासून राज्यामध्ये जिल्हे बदलत बदलत पावसाने सतत हजेरी लावली आहे. तसेच बघितले तर मुंबईमध्ये एक ते 20 जुलै दरम्यान सरासरी पावसापेक्षा अधिकची नोंद झाली आहे. वेळेवरती पाऊस आल्यामुळे शेतकरी राजा सुद्धा सुखावला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने जोर धरलेला आहे. ठाण्यासोबत विरार मध्ये मुसळधार पाऊस सुरू होता तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईमधील दोन तलावा पैकी तुळशी तलाव हा 20 जुलै रोजी भरून वाहू लागलेला आहे. तसेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु हा जोर पुढील ३-४ दिवसांपर्यंत कायम राहणार असून तो राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहील याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
Hawaman Anadaz
राज्यामध्ये काही दिवसांपासून पाऊस चांगला जोर धरून आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण गुजरात पासून तर उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत समांतर रूपाचा कमी दाबाचा पट्टा बघायला मिळत आहे.
यामुळेच मुंबई सोबत राज्यामधील अनेक भागात मुसळधार पाऊस बरंसताना दिसून आहे. येणारे पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाद्वारे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आज साठी जर बघितले तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यावेळी अति मुसळधार पाऊस सुद्धा बरेचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण झाल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; या महिलांना 1500 रूपये महिना मिळणार नाहीत.
पुढील तीन-चार दिवसाचा हवामान अंदाज
जिल्ह्याचे नाव | हवामान अंदाज |
रायगड | ऑरेंज |
रत्नागिरी | ऑरेंज |
सिंधुदुर्ग | येलो |
मुंबई | येलो |
ठाणे | येलो |
पालघर | येलो |
नाशिक | येलो |
कोल्हापूर | येलो |
सातारा | येलो |
अकोला | ऑरेंज |
नागपूर | ऑरेंज |
अमरावती | ऑरेंज |
वर्धा | ऑरेंज |
यवतमाळ | ऑरेंज |
पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात 27 मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69 मार्ग बंद झाल्याचे दिसून येत आहेत. संततधार पावसामुळे अल्लापल्ली सिरोंचा मार्ग पर्यायी मार्ग वाहून गेल्याने रस्ता ठप्प झाला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळा बंदचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे उत्तर गडचिरोलीमध्ये सर्वात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे दिसून येत आहे. गोसे खुर्द धरणाची सर्व 33 दार उघडलेली असून पावसामुळे 75 घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा