Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला
Ladka Bhau Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तरुणांसाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिलेली आहेत आहे. राज्यातील दरवर्षी कितीतरी विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून व्यवसाय तसेच नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात. परंतु नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागतअसते. आणि दिवसेंदिवस तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे.
या पार्श्वभूमीवर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024–25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यासाठी मंजुरी दर्शवलेली आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत व तरूणांना तसेच उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेच्या अटी खालील प्रमाणे आहेत.
- तरुणांचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान असावेत.
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12 वी असावीत.
- अर्जदार उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- उमेदवाराची आधार नोंदणी असने बंधनकारक आहे.
- उमेदवाराचे आधार लिंक बॅक खाते असावे.
- उमेदवाराने कोशल रोजगार व उद्योजकता आयुक्तांच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
शिक्षण पूर्ण केलेल्या आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करुन प्रशिक्षणासाठी गेलेल्या तरुणांना प्रशिक्षण कालावधी सहा महिने तरुणांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दर महिन्याला खालील प्रमाणे वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी खालील YouTube video मध्ये पहा. सदर योजनेचा शासन निर्णय (GR) पहा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा.