ladki bahan Yojana form rejected : सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेची सर्व दूर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यांमधील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला दरवर्षी पूर्ण वर्षांमध्ये 18 हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून भेट देण्यात येणार आहे. यामध्ये विवाहित, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरता वयाची अट 21 ते 65 वर्षे ठेवण्यात आलेली आहे.
ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबांमधील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लागू असणार आहे. सद्यस्थितीमध्ये ज्या महिलांचा जन्म पर राज्यामध्ये झालेला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रामधील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केलेला आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात ही एक जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट देण्यात आलेली आहे.
ladki bahan Yojana form rejected
योजनेचा लाभ केव्हा मिळेल ?
या योजने करता ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्या व दुसऱ्या त्याचे वितरण एक सोबत होणार असून त्यांच्या खात्यावरती ३००० रुपये जमा करण्यात येणार आहे. हा लाभ महिलांच्या खात्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. त्यामुळे या करता या योजनेचा लाभ मिळवण्याकरता महिलांची मोठ्या प्रमाणात धावपळ होताना दिसत आहे. कारण या योजनेच्या नियमांमध्ये शासन प्रत्येक वेळेस नवनवीन बदल करत आहे.
ladki bahan Yojana form rejected
त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवणाऱ्या महिला मोठ्या संभ्रमा अवस्थेमध्ये सापडलेले आहे. आपण जर बघितले तर सध्या स्थितीमध्ये या योजने करता दररोज 70 ते 80 हजार फॉर्म भरले जात आहे. आतापर्यंत या योजने करता एक कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहे. अर्ज करण्याकरता सेतू केंद्राबाहेर तसेच अंगणवाडी सेविकांकडे महिलांची मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळत आहे तर काही महिला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करत आहे.
या गोष्टी चेक करून घ्या
शासनाने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे ठरवले आहे. जसे की महिलांचे आधार कार्ड अपडेट असणे किंवा बँकेला लिंक असणे आवश्यक असणार आहे. यामुळे बँकांच्या बाहेर सुद्धा महिलांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. त्यामध्ये आता एक नवीन माहिती समोर येत आहे यामुळे या योजने करता अर्ज केलेल्या लाखो महिला अर्जदारांमध्ये मोठ्या प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे.
ladki bahan Yojana form rejected
आपण बघितले तर महिलांनी तासंतास रांगेमध्ये उभे राहून या योजने करता अर्ज केलेल्या आहेत तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना सर्वर डाऊन असल्याचा देखील खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. म्हणजेच ऑफलाइन सुद्धा अर्ज करताना आणि ऑनलाईन अर्ज करताना सुद्धा महिलांना मोठी मेहनत घ्यावी लागलेली आहे. आता याच दरम्यान ज्या महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत त्या अर्जांची सद्यस्थिती मध्ये पडताळणी सुरू आहे.
ladki bahan Yojana form rejected
शासनाद्वारे या योजनेकरता सादर केलेल्या अर्जाची छाननी सुरू असून ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत ते सर्व अर्ज इंग्रजी भाषेमधून भरलेले आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुसार ज्या महिलांनी शासनाच्या या योजने करता मराठी मधून अर्ज सादर केलेले आहेत हे अर्ज रद्द (ladki bahan Yojana form rejected) ठरणार आहेत त्यामुळे सध्या महिला वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात मनस्ताप झाल्याची भावना दिसून येत आहे. त्यामुळे आपण भरलेला अर्ज रद्द होणार का अशी भीती आता महिला वर्गांमध्ये दिसून येत आहे.
मराठीतून अर्ज का रद्द केले जात आहे? (ladki bahan Yojana form rejected)
आपण बघितले तर या योजने करता सादर केलेल्या अर्जाची छाननी करण्याचे काम शासनाद्वारे करण्यात येत आहे. शासनाकडून ज्या एजन्सी करता हे काम देण्यात आलेले आहे त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड देण्यात आलेली आहे. मराठी भाषेचा यांच्याकडे अपडेट नसल्यामुळे त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतूनच भरले जावे हे अर्ज मराठी भाषेतून भरलेले अर्ज रद्द(ladki bahan Yojana form rejected) केले जातील अशा प्रकारची माहिती, समोर येत आहे. परंतु आपण बघितले तर सर्वात जास्त अर्ज हे मराठीतून केले गेले आहे.
एप्लीकेशन मध्ये मराठी भाषेचा वापर
विशेष बाब म्हणजे एप्लीकेशन मध्ये सुद्धा मराठी भाषेचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. यामुळे अनेक नागरिकांनी अर्ज हे मराठी मधूनच दाखल केलेले आहेत. परंतु आता मराठी मधून सादर करण्यात आलेले अर्ज बाद होणार का अशी भीती सर्वांचे मनामध्ये लागून आहे. त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी बघायला मिळत आहे. कारण तासंतास लाईन मध्ये उभे राहून, घरातील तसे इतर सर्व कामे बाजूला ठेवून महिलांनी आपले अर्ज तसेच कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. त्यामध्ये महिलांची कुठलीही चूक नसताना त्यांचे अर्ज रद्द (ladki bahan Yojana form rejected) केले जात आहे. यामुळे महिला वर्गामध्ये मोठा मनस्ताप बघायला मिळत आहे.
हे वाचा :
लाडक्या बहिणींचे अर्ज आता पटापट मंजूर होतील; शासनाची नवीन वेबसाईट सुरू.! सविस्तर माहिती बघा.!
युवकांसाठी जबरदस्त योजना ;आता मिळणार गॅरंटीशिवाय 20 लाखांपर्यंत मुद्रा लोन, अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा.!
महिला वर्गांचे प्रश्न ?
जर अर्ज इंग्रजीमध्ये स्वीकारायचे होते तर एप्लीकेशन मध्ये मराठी भाषेचा ऑप्शन का दिला? मराठी भाषेत अर्ज नको होते तर ही माहिती अर्ज करण्या अगोदरच द्यायला हवी होती? अशा प्रकारचे अनेक संतप्त सवाल महिला वर्गांमधून केले जात आहे. मात्र ज्या महिलांनी मराठी मधून अर्ज केलेले आहे त्या अर्जाचे काय होणार? या सर्व महिलांचे (ladki bahan Yojana form rejected) अर्ज बाद होणार का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न महिला वर्गांमध्ये उपस्थित होत आहे.
यासाठी काय उपाययोजना कराव्यात ?
ज्या महिलांनी अगोदरच मराठी मधून अर्ज सादर केलेले आहेत. अशा सर्व महिलांनी एप्लीकेशन मध्ये किंवा ऑफलाइन पद्धतीने जर सादर केलेले असेल तर आपल्या फॉर्मची स्टेटस काय आहे हे चेक करून घ्यावे. तुमचा फॉर्म इन प्रोग्रेस किंवा पेंडिंग दाखवत असेल तर सदर अर्जाची पूर्ण पडताळणी होऊ देणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांची यादी ही महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जारी केली जात आहे. आणि ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही उनिवा असतील तर अशा सर्व महिलांचे दर शनिवारी अंगणवाडी सेविकांकडून याची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा