Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय ? पुर्ण माहिती पाहा

Lakhpati Didi Scheme: केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते. या योजनांमुळे लोकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारच्या महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते.या योजनेच नाव लखपती दीदी असे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Lakhpati Didi Scheme

मोदी सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासोबतच आर्थिक मदतदेखील केली जाते.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसेच व्यवसाय कसा करायचा याबाबत टीप्सदेखील दिल्या जातात.

हे वाचा : रेशन कार्ड होणार बंद लवकर करा हे काम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 

Lakhpati Didi Scheme

या योजनेत महिलांना आर्थिक टीप्स, बिझनेस मार्केटिंग प्लान याबाबत माहिती दिली जाते. याचसोबत ऑनलाइन बँकिंगबाबत माहिती दिली जाते. आतापर्यंत जवळपास ९ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेमुळे बचत बटाशीसंबंधित महिलांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात भेट द्यावी लागेल. त्यानंतर योजनेचा फॉर्म अधिकाऱ्याकडून घ्यावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्ही सर्व माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे जमा करा. त्यानंतर अर्जदाराला पावती दिली जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र

उमेदवाराकडे आधारकार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, पॅन कार्ड, बँक खाते असणे गरजेचे आहे. या योजनेत महिलांना आर्थिक साक्षरता वर्कशॉप, सेव्हिंग इन्सेंटिव्ह, मायक्रोक्रेडिट सुविधा, स्किल डेव्लपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा