Lek Ladaki Yojana : लाडक्या बहिणींना 1500 तर लाडक्या लेकींना सरकारकडून 1 लाख 1000 रुपये मिळणार सरकारची नवीन योजना.!

Lek Ladaki Yojana
Lek Ladaki Yojana
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Lek Ladaki Yojana : मागील काही दिवसांपासून लेक लाडकी योजनेची चर्चा सर्वजण सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा सुद्धा झालेले आहे. ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा उर्वरित महिलांना सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्र महिलांकरता सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महा 1500 रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. मात्र एकीकडे लाडक्या मुलींकरता तब्बल 75 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जात असून या योजनेकडे कुणाचे लक्ष नाही. या योजनेच्या अंतर्गत मुलींना सरकारकडून अर्थसहाय्य प्राप्त करून दिले जाते. तर नेमकी ही योजना काय आहे? या योजनेच्या लाभाकरता अटी काय आहे? ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण समजून घेऊया. कारण तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Lek Ladaki Yojana

राज्य सरकार द्वारे एक एप्रिल 2023 पासून राज्यातील मुलींकरता (Lek Ladaki Yojana) माझी कन्या भाग्यश्री या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या मुलींचे समीक्षकरन घडून यावे याकरता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत नागरिकांच्या मनामध्ये मुलींबद्दल आदरभाव निर्माण व्हावा. तसेच मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला जास्तीत जास्त जालना मिळवून देणे, राज्यातील मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, त्याची शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्य वरती अन्याय करता प्रोत्साह निर्माण करणे ही योजना मागील प्रमुख उद्दिष्टे आहेत.

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री
यांच्या द्वारेमहाराष्ट्र शासन
लाभ1 लाख 1 हजार रुपये
शासन निर्णयइथे क्लिक करा

लेक लाडकी योजनेचा काय लाभ मिळणार? (Lek Ladaki Yojana)

या नागरिकाकडे पिवळे तसेच केसरी शिधापत्रिका असेल अशा सर्व कुटुंबांमधील मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिली मध्ये गेल्यानंतर ६ हजार रुपये, इयत्ता सहावीत गेल्यानंतर ७ हजार रुपये, इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर ८ हजार रुपये, तसेच लाभार्थी मुलीचे वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये अशा प्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये पात्र कुटुंबातील मुलींना देण्यात येणार आहे.

या योजनेच्या मुख्य नियम व अटी काय? (Lek Ladaki Yojana)

राज्य सरकारकडून ही योजना पिवळ्या तसेच केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये सन १ एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या एक तसेच दोन मुलींना ही योजना लागू राहील. त्याचप्रमाणे जर एक मुलगा एक मुलगी असेल तर ही योजना एका मुलीला मिळेल. पहिल्या आत्त्याच्या तिसऱ्या हप्त्याकरता व दुसऱ्या आपतच्या दुसऱ्या हप्त्याचा अर्ज सादर करताना माता किंवा पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे सुद्धा अनिवार्य असणार आहे. दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी अथवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु त्यानंतर माथ्याने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

याकरता लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर लाभार्थीचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यातले असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. अशा प्रकारच्या या योजनेच्या मुख्य नियम व अटी देण्यात आलेले आहे.

हे वाचा :1 ऑगस्टपासून अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये ‘या’ तारखेपासून जमा होणार!

लेक लाडकी योजने करता आवश्यक कागदपत्रे? (Lek Ladaki Yojana)

लेक लाडकी योजनेचा लाभ तुम्हाला सुद्धा मिळवायचा असेल तर याकरता काही आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील दिलेले कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे.

  • लाभार्थी व्यक्तीचा जन्माचा दाखला
  • कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला(या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे)
  • लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड (पहिल्यांदा लाभ घेत असताना आधार कार्ड नसेल तरी चालेल)
  • पात्र व्यक्तीच्या वडिलांचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाचे छायांकित झेरॉक्स
  • रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे -झेरॉक्स)
  • लाभार्थी व्यक्तीच्या पालकांचे मतदान ओळखपत्र
  • संबंधित टप्प्यावरील लाभार्थी करता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला चा पुरावा
  • ठराविक कालावधीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक असणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरता तुमच्या शहरातील अंगनवाडिसेविका किंवा आरोग्यसेविका यांना संपूर्ण महिती विचारू शकता

Lek Ladaki Yojana

अशाप्रकारे तुम्ही सुद्धा लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपयांचा लाभ मिळवू शकता. तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा. माहिती शेअर करण्यासाठी खालील सोशल मीडिया आयकॉन वरती क्लिक करून ही पोस्ट तुम्ही जास्तीत जास्त शेअर करू शकता.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा