Monsoon Update : मान्सून कर्नाटक, गोव्यापर्यंत, महाराष्ट्रात कधीपर्यंत मान्सून येईल ?

Monsoon Update: When will Monsoon reach Karnataka, Goa, Maharashtra?
Monsoon Update: When will Monsoon reach Karnataka, Goa, Maharashtra ?
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Maharashtra Monsoon Update : येत्या आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon ) दाखल होण्याची शक्यता तज्ञ माणिकराव यांनी वर्तवली आहे. 

Maharashtra Monsoon Update : सर्वदूर पावसाची ओढ लागली असून मान्सून (Monsoon) केरळातून पुढे सरकला आहे. लवकरच महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मान्सून कुठपर्यंत पोहचला आहे ? महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहचणार आहे? याबाबत उत्तरे जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. 

 मान्सून कुठपर्यंत पोहोचला आहे ?

मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे आज गोवा, दक्षिण कर्नाटक,दक्षिण आंध्रप्रदेश पर्यन्त पोहोचला. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण जाणवत आहे. काल मंगळवार दि. ४ जूनला महाराष्ट्रातील बराचश्या भागात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व वळीव पावसाने हजेरी लावली होती .              

मान्सून कधीपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे ? 

आजपासुन, सोमवार दि. १० जूनपर्यंतच्या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी, पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या १२ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून कधीही हजेरी लावण्याची शक्यता जाणवत आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता आहे असे तज्ञ म्हणतात.