MSP Kharif Crop : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमिभावात झाली वाढ , पिकांची यादी पाहा

MSP Kharif Crop
MSP Kharif Crop
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

नवी दिल्ली : २०२४-एमएसपीमध्ये किती वाढ ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (MSP Kharif Crop) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसी मान्य करून १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्या.

MSP Kharif Crop : एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ 

केंद्र सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. बुधवारी (19 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हमीभाव वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर याच बैठकीत हमीभावासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची माहिती दिली.

Kharif Crop Loan : खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला मिळत आहे ? पुर्ण माहिती पाहा

MSP Kharif Crop :एमएसपीमध्ये किती वाढ ?

धान्य२०२४-२५२०२३-२४वाढ
तांदूळ (सामान्य)२,३००२,१८३११७
तांदूळ (ए ग्रेड)२,३२०२,२०३११७
ज्वारी (हायब्रीड)३,३७१३,१८०१९१
ज्वारी (मालदंडी)३,४२१३,२२५१९६
बाजरी२,६२५२,५००१२५
रागी४,२९०३,८४६४४४
मका२,२२५२,०९०१३५
तूर७,५५०७,०००५५०
मूग८,६८२८,५५८१२४
उडीद७,४००६,९५०४५०
भुईमुग६,७८३६,३७७४०६
सूर्यफूल७,२८०६,७६०५२०
सोयाबीन४,८९२४,६००२९२
सोयाबीन९,२६७८,६३५६३२
रामतीळ८,७१७७,७३४९८३
कापूस (मध्यम धागा)७,१२१६,६२०५०१
कापूस (लांब धागा) ७,५२१७,०२०५०१
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

MSP Kharif Crop : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमिभावात झाली वाढ,