Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बद्दल संपूर्ण माहिती कागद पत्रा सकट

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” लागू केली आहे. यामध्ये २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, परितक्त्या, विधवा महिलांना दरमहा रुपये १५००/- त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत चालू होणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: अटी व शर्ती

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती लागू आहेत:

  • २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, परितक्त्या, विधवा महिला.
  • महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक.
  • कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
  • महिलेच्या नावे बँक खाते असणे आवश्यक.
  • रेशन कार्डमध्ये महिलेचे नाव अंतर्भूत असावे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: नोंदणी प्रक्रिया

या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना “नारी शक्ती दूत” ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १००% नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

Ration Card Application Online Maharashtra : घरबसल्या असे काढा ऑनलाइन रेशन कार्ड ? पुर्ण माहिती पाहा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana महत्वाची कागदपत्रे

नोंदणी करताना आवश्यक असणारी कागदपत्रे:

  • उत्पन्नाचा दाखला (२०२५ पर्यंत वैद्य).
  • जन्माचा दाखला / टी.सी झेरॉक्स / डोमेसाईल प्रमाणपत्र.
  • रेशन कार्ड झेरॉक्स.
  • आधार कार्ड.
  • लाभार्थी नावाने बँक पासबुक झेरॉक्स.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: जनजागृती

सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिलांना योजनेबाबत माहिती देणे आवश्यक आहे. “नारी शक्ती दूत” ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून त्यांना अर्ज करण्यास सांगावे.

गावातील इतर पात्र असणाऱ्या २१ ते ६० वयोगटातील महिलांना आवश्यक कागदपत्र तयार करून सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून अर्ज करण्यास मदत करावी. गावातील माता सभा घेऊन जनजागृती करावी. १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत कोणतीही पात्र महिला योजनेतून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: सर्वांसाठी माहिती

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana गावातील सर्व ग्रुपमध्ये योजनेबाबत माहिती शेअर करावी. आवश्यक असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी व संबंधित बीटच्या पर्यवेक्षिकांचा मोबाईल नंबर द्यावा.


अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

mazi ladki bahin yojana maharashtra online apply ,

Leave a Comment