PM Kisan Yojna : PM Kisan चा 17 वा हप्ता या दिवशी खात्यात होणार जमा; पुर्ण माहिती पाहा

PM Kisan Yojna
PM Kisan Yojna
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

PM Kisan Yojna : PM Kisan चा 17 वा हप्ता या दिवशी खात्यात होणार जमा; पुर्ण माहिती पाहा

PM Kisan Yojna : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी शपथविधी होताच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17 वा हप्त्याला मंजूरी दिली. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल, असे सांगण्यात येत होते. आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होईल, याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी योजनेचा 16 वा हप्ता या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जमा केला होता. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी एक बटण दाबून हा पैसा हस्तांतरीत केला होता.

PM Kisan Yojna : 17th installment of PM Kisan will be deposited in the account on this day

PM Kisan Yojna चा 17 वा हप्ता कधी होणार जमा ?

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी जमा होणार याविषयीची उत्सुकता होती. शेतकऱ्यांना पेरणीच्या कालावधीत ही थोडीफार होणारी मदत कामाला येणार आहे. त्यामुळे शेतकरी दोन हजार रुपयांची प्रतिक्षा करत आहेत. एका माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान 18 जून रोजी ते पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा करतील.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.

ही चार कामे आताच करा

  • आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते तपासा
  • बँक खाते NPCI सोबत संलग्न असणे आवश्यक
  • केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे
  • भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तवेजांचे सत्यापन आवश्यक आहे
  • तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते पण तपासा

PM Surya Ghar Scheme: आता वीजबिलचं नो टेन्शन, मनसोक्त वापरा वीज; केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेसाठी करा अर्ज

eKYC करा

  • ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
  • बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
  • फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.
  • पैसे जमा झाले की नाही ते असे तपासा
  • सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
  • या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
  • या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
  • आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

PM Kisan हेल्पलाईन क्रमांक

  • पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  • पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
  • पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266
  • पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606
  • 14व्या हप्त्याबाबत अडचण असल्यास : 011-24300606
PM Kisan ई-मेलवर करा तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

PM Kisan Yojna : PM Kisan चा 17 वा हप्ता या दिवशी खात्यात होणार जमा; पुर्ण माहिती पाहा