PM Pik Vima Scheme : एक रुपयात काढा पीकविमा; ७ लाख शेतकऱ्यांना मिळेल लाभ, योजनेची पुर्ण माहिती पाहा

PM Pik Vima Scheme
PM Pik Vima Scheme : एक रुपयात काढा पीकविमा; ७ लाख शेतकऱ्यांना मिळेल लाभ, योजनेची पुर्ण माहिती पाहा

PM Pik Vima Scheme

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

परभणी : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी या वर्षी देखील पीक विमा योजना सुरु केली आहे. एक रुपयात पीक विमा उतरवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

PM Pik Vima Scheme

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६ पासून अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत गतवर्षीपासून राज्य शासनाच्या सहकार्याने (Parbhani) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपया भरून सर्वसमावेशक पीकविमा योजनेत सहभाग घेता येत आहे. या योजनेचा परभणी जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांना जवळपास ४८ कोटी ९० लाख रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) यंदाही एक रुपयात पीकविमा भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमिभावात झाली वाढ , पिकांची यादी पाहा

PM Pik Vima Scheme

राज्य शासनाने २०२३ पासून सर्व समावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. हि नोंदणी करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  तसेच ही योजना दुसऱ्या जिल्हयापर्यंत सुद्धा लवकरात लवकर पोहचण्याचा प्रशासन प्रयत्न करेल.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा