
PM Vishwakarma Yojana
PM Vishwakarma Yojana: देशातील नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार नेहमीच आर्थिक मदत करत असते. सरकारच्या अनेक योजना या स्टार्टअपसाठी राबवल्या जातात. तरुणांनी स्टार्टअप सुरु करुन रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात या उद्देशाने अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्ना योजना.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत २०२३ मध्ये विविध क्षेत्रातील कामगारांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेअंतर्गत १९ सप्टेंबरला वर्धा येथे किट वाटप केले जाणार आहे. या योजनेमुळे लाखो कारागिरांना मदत मिळणार आहे.
PM Vishwakarma Yojana
पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे नक्की काय ?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पिढ्यानपिढ्या करत असलेल्या व्यवसायांना किंवा कामगारांच्या कौशल्याला पाठिंबा दिला जातो. या योजनेत १८ ट्रेडला आर्थिक मदत मिळते. धोबी, लोहार, मूर्तिकार या क्षेत्रातील कामगारांना मदत केली जाते. या योजनेत व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाखांचे लोन दिले जातात.
हे वाचा : Ration Card Update : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता फक्त तांदूळ नव्हे तर सरकार या ९ गोष्टी देणार फ्री.! माहिती सविस्तर वाचा
या योजनेत लोनसोबत स्किल ट्रेनिंग प्रोग्रामदेखील राबवला जातो. स्किल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नागरिकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याचे मार्केटिंग कसे करायचे हे शिकवले जाते. व्यवसाय सुरु करताना १ लाख रुपये दिले जातात. नंतर दोन लाख रुपये लोन दिले जाते. या योजनेत स्किल डेव्लपमेंट प्रोग्रामसोबत ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.
योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
या योजनेचा लाभ १८ ते ५० वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. त्यांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि कर्ज दिला जाते. तुम्ही या योजनेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात.www.pmvishwakarma.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज दाखल करु शकतात.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा