Rain Update Maharashtra : ठाणे जिल्ह्यात ऑरेंज, तर मुंबईला यलो अलर्ट; पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस

Rain Update Maharashtra
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

Rain Update Maharashtra : येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain Update Maharashtra : कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट

ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain Update Maharashtra : विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

👉हे वाचा : फ्री शिलाई मशीन योजना 2024 , महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..! 👇🏻

Rain Update Maharashtra : ठाणे जिल्ह्यात ऑरेंज, तर मुंबईला यलो अलर्ट; पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस

Rain Update Maharashtra ,